Shree devi hedubai mandir khudi
जागृत देवस्थाने
हिरव्यागार डोंगरद-यांच्या कुशीत वसलेल्या खुडी गावाचे ग्रामदैवत मायमाउली श्री देवी हेदुबाई! याशिवाय गावात महालक्ष्मी, कुलस्वामीनी, भुतेश्वर, गांगेश्वर, हनुमान, श्री गणेश आणि वाघदेश्वर आदी. मंदिरे व देवस्थाने आहेत. प्रत्येक देवस्थानाला स्वत:चा वैशिष्ट्यपुर्ण असा इतिहास आहे.
![]() |
Shree devi hedubai mandir khudi |
Shree devi hedubai mandir khudi
ग्रामदैवत मायमाउली श्री देवी हेदुबाई
अखंडनिवासिनी मायमाउली श्री. देवी हेदुबाई म्हणजे खुडीवासीयांचे ग्रामदैवत. पुर्वी गुराखी गुरे चरवण्यासाठी मळय येथे जात असत. एके दिवशी एका गुराख्याचा लक्ष एका झाडाखाली गेला. तेथे झाडाखाली एक पाशाण होते. त्या गुराख्याने ही गोष्ट गावक-यांना सांगितली. दुस-या दिवशी सगळे गावकरी गेले आणि पाहीले असता ते पाशाण देवीचे होते. गावक-यांनी पाशाणाला त्याच हेदीच्या झाडाखाली ठेवायचा विचार केला. त्या ठिकाणी गवताची खोपटी बांधली. एक गुराखी दररोज देवीपुढे दिवा लावायचा.
Shree devi hedubai mandir khudi
![]() |
Shree devi hedubai mandir khudi |
काही वर्षानंतर गुराखी दिवा लावुन घरी जात होता. कावळ्याने दिव्यातील वात नेऊन खोपटीवर ठेवली. खोपटी पेटायला लागली. खोपटी पेटताना पाहुन गु-याख्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग काही विजेना. ही बातमी गावक-यांना समजली. गावक-यांनी मुर्ती गावात स्थापित करायचे ठरवले. ही मुर्ती डोंगरीच्या भरडावर स्थापन करायचे असे ठरले. आणि डोंगरीच्या भरडावर उदयास आली एक भव्य-दिव्य वास्तु. देवीला या मंदिरात स्थापन करण्यात आले. आता गावक-यांसमोर प्रश्न पडला देवीला कोणत्या नावाने हाक मारायची? काही गावक-यांनी सांगितले की, देवीचे पाशाण हेदिच्या भाटीत होते म्हणुन देवीला हेदुबाई असे नाव ठेऊया. म्हणुन त्या मुर्तीला नाव पडले.
खुडी गावाचे ग्रामदैवत मायमाउली श्री देवी हेदुबाई! येथे आल्यावर समस्त भाविकांना लाभते संपुर्ण शांती, समाधान आणि प्रसन्नता. मंदिराच्या सभोवती जुनाट वृक्षांची दाचीवाटी, काजु,आंबा,फ़णस यांची वृक्ष आणि महाकाय वटवृक्ष तसेच मोहोर व फ़ुले यांचा वेगळाच गंध अशा विविधांगी निसर्गाची मुक्त उधळण येथे अनुभवास येते. भव्य स्वरुपातील श्री देवी हेदुबाई मंदिर प्रवेशद्वारावरील पायरीला स्पर्श करताच दिमाखदारपणे उभी असलेली मंदिराची वास्तु नजरेस पडते. मंदिराच्या समोर तीन दिपमाळ आहेत. शेजारी भावय देवीचे मंदिर आहे. मंदिरात सुंदर व आकर्षक मुर्ती आहे. हेदुबाई मंदिराच्या चारी बाजुला चिरेबंदी तटबंदी आहे.
मंदिरात श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमा आणि हरीनामसप्ताह इ. उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरे केले जातात. दरवर्षी कार्तिक शुद्ध उत्तप्त्ती एकादशीला सुरु होणारा #हरीनाम_सप्ताह म्हणजे हजारो भाविकंचा कुंभ-मेळाच होय. घटस्थापना करुन हरीनाम सप्ताहाची सुरुवात होते. अष्टप्रहर अखंड टाळ मृदुंगांच्या नाद लहरींमध्ये विठैरायाचे गुणगान गायिले जाते. देवगड,कवकवली,मालवण सहित वैभववाडी तालुक्यातील भजनीमेळे आपल्या सुस्वर स्वरांनी खुडीनगरीला प्रती पंढरपुर नगरीच बनवतात. संपुर्ण आवार हरीनामाने दुमदुमुन जाते. एकादशीपासुन रोज रात्री सात दिवस देवी हेदुबाई माऊलीची पालखी ढोल,ताशे,टाळ यांच्या गजरात विठुरायाच्या नामघोषात मंदीराभोवती प्रदक्षिणा करते.या हरीनाम सप्ताहात देव दिवाळीची रात्र तर भाविकांना भक्तीभावाची पर्वनीच देउन जाते. हे हरीनामपर्व डोळ्याचे पारणे फ़ेडणारे असते. या सोहळ्यास भाविक आवर्जुन उपस्थिती लावतात. आठव्या दिवशी सकाळी ५ वाजता काकडी आरत करुन त्यानंतर हंडी फ़ोडुन हरीनाम सप्ताहाची सांगता केली जाते. या दिवशी मंदिरामध्ये गावजेवण असते. या दिवसापासुन ८ दिवसांनी वार्षिक पारंपारीक दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला जातो.
Shree devi hedubai mandir khudi ( khudi village )
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.